चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 30 एप्रिल रोजी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
महानगरपालिकेचे नगरसचिव कवडू नेहारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली यावेळी मनपाच्या उपस्थित कर्मचाऱ्याने देखील राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, भजन आणि राष्ट्रप्रेम समाजाला दिशादर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.